(The content is contributed to The Sundarban Times by Sonali More)
सुंदरबन
आहे जिथे हिरवा निसर्ग, वाटते खरोखर सुंदर वन
आदर्श सोसायटी आमची, नाव जिचे सुंदरबन।
रस्त्याच्या दुतर्फा आहेत, सुंदर डौलदार झाडे
सोसायटीच्या आत येताच, कोणालाही प्रसन्न वाटे।
सुंदरबनात आहेत, एकूण इमारती आठ
पक्ष्यांचा किलबिलाटात, होते रोज पहाट।
चिमण्या, कावळे, पोपट, कोकिळा अन भारद्वाज
मंजुळ स्वराने त्यांच्या, हिरवाईला चढोत साज।
छोटेसे टुमदार, अन देखणे आहे मंदिर श्रीगणेशाचे
बोलके डोळे, अन सुंदर रूप आमच्या गणरायाचे।
बास्केटबॉल, फुटबॉल, खो-खो असो वा कबड्डी
मोकळ्या पटांगणात खेळून, होते मुलांची प्रगती।
चैतन्य अन उत्साहात, होतात सण सारे साजरे
खुलून येते प्रसन्नतेने, सोसायटी चे रूप गोजिरे।
सर्वधर्मसमभाव वृत्तीने, राहतात येथे रहिवासी
अभिमानाने म्हणवतात सारे, आम्ही सुंदरबनवासी।
सोनाली । ०१.०७.२०२०
1 Comments
This comment has been removed by the author.
ReplyDelete